Udyogvikas

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नोकरी व रोजगाराचीही सुवर्णसंधी

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर (Career Mantra) वाढत आहे. अशा परिस्थितीत नोकरीसाठी किती झगडावे लागते हे आपण पाहत आहोत. लोकांना नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: पदवीधर झालेल्या तरुणांना आजकाल नवीन नोकरी मिळणे फार कठीण जात आहे, कोरोनानंतर ही अडचण खूप वाढली आहे. आजच्या जगात फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही. आजच्या काळात कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये कौशल्य विकास च्या पदविका व पदवी  कोर्सेस,ची सर्वाधिक मदत होत आहे. 

शिकत असतानाच विद्यार्थ्यांना काम करता यावे आणि त्यांचा कौशल्यविकास व्हावा, यासाठी उद्योगविकास -ओ आर टी   ने बीव्होक इन रिटेल मॅनेजमेंट’ (B.Voc. in Retail Management),  बीव्होक इन फॅशन डिझाईन  (B.voc in fashion design ),बीव्होक इन  इंटेरिअर डिजाईन (B.voc in Interior  design),बीव्होक इन ऍनिमेशन अँड ग्राफिक्स डिजाईन (B.voc in Animation and Graphics design),बीव्होक इन लॉजिस्टिकस मॅनॅजमेन्ट  (B.voc in logistics Management), बीव्होक इन  इ कॉमर्स  आणि  डिजिटल मार्केटिंग  (B.voc in E -Commerce and Digital Marketing),बीव्होक इन सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट (B.voc in Software development ) यासारख्या विविध विषयांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढवणे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रशिक्षणासह विविध आधुनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून, तरुण त्यांच्यामध्ये दडलेली कौशल्ये विकसित करण्यास सक्षम होतील. त्यात त्यांना महिना १२००० ते १५००० रुपये कमावण्याची सुद्धा संधी उपलब्ध झाली आहे

BVoc चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ वोकॅशन. BVoc हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये ऐकून ६  सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षात २ सेमिस्टर असतात.ह्या कोर्सची विशेषता  म्हणजे ह्या कोर्सला मल्टिपल एक्सिट पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्ही कोर्सच्या कोणत्याही वर्षी कोर्स शकता आणि कोर्स सोडल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते. बाकी कोर्समध्ये तुम्ही मधीच कोर्स  सोडला तर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जात नाही.

team, hands, success-4864038.jpg

जर तुम्ही BVoc चे पहिले वर्ष पूर्ण करून कोर्स सोडला तर म्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट दिले जाते. जर तुम्ही BVoc चे दुसरे वर्ष पूर्ण करून कोर्स सोडला तर तुम्हाला अडवान्सड डिप्लोमा सर्टिफिकेट दिले जाते.जर तुम्ही BVoc चे सर्व वर्ष (३ वर्ष) पूर्ण केले तर तुम्हाला त्या कोर्सचे पदवीधर सर्टिफिकेट दिले जाते. BVoc specalisation कोर्सला तुम्ही बारावी नंतर कोणत्याही स्ट्रीमचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता.BVoc कोर्समध्ये प्रॅक्टिकल ट्रैनिंगला जास्त भर दिला जातो. 

प्रत्येक सेमिस्टरमध्ये  विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर करायचा असतो त्यात विद्यार्थ्यंच्या कलात्मक गुणांचा विकासावर जसे कल्पकता ,संवाद ,क्रिटिकल थिंकिंग ,निरीक्षण ,विजुलियाजशन ,समस्या निवारण ,तार्किक क्षमता भर दिला जात असून आत्मविश्वासाने विद्यार्थी त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करू शकतात.

B.voc कोर्से केल्यावर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,संघ लोकसेवा आयोग ,बँकिंग क्षेत्र ,पोलीस अधिकारी ,तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी ,इनकम टॅक्स ऑफिसर अशा विविध पदांच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसता येते

वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आज डिझायनर्सची गरज भासत असते. टूथपेस्टपासून कारपर्यंत प्रत्येक उत्पादन आकर्षक कसं दिसेल याची काळजी डिझायनर्स घेतात. ),  बीव्होक इन फॅशन डिझाईन  (B.voc in fashion design ),बीव्होक इन  इंटेरिअर डिजाईन (B.voc in Interior  design),बीव्होक इन ऍनिमेशन अँड ग्राफिक्स डिजाईन (B.voc in Animation and Graphics design),हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

टूथपेस्टच्या ट्यूबपासून ते सुपरकारच्या मॉडेलपर्यंत आपलं प्रोडक्ट आकर्षक दिसावं यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करत असते. त्या कामी कंपनीला डिझायनरची मदत लागते. त्या उत्पादनाची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट आकर्षक कशी दिसेल, लोकांना ती सहज आवडेल का हे बघण्याची जबाबदारी या डिझायनरकडे असते. तेव्हा डिझायनिंग म्हणजे केवळ फॅशन डिझायनिंग असं समजण्याचं अजिबात कारण नाही. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतून बारावी पूर्ण केलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. त्यामुळे कलेची आवड असलेल्या प्रत्येकासाठी  डिझाईन हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

हा अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीअल डिझाइन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, अॅनिमेशन डिझाइन, इंटरॅक्शन डिझाइन यासारख्या विषयांत स्पेशलायझेशनसुद्धा करता येणार आहे. याचबरोबर या विद्यार्थ्यांना या विषयात मास्टर्स तसंच पीएचडीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात डिझायनर म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. 

तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल मार्केटिंग हा जवळजवळ प्रत्येक व्यवसायाचा अविभाज्य भाग बनला आहे. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणारे विदयार्थी किंवा व्यावसायिक यांनी बीव्होक इन  इ कॉमर्स  आणि  डिजिटल मार्केटिंग  (B.voc in E -Commerce and Digital Marketing), विषयी अधिक माहिती घेणे गरजेचे आहे.बरेच विद्यार्थी आणि व्यावसायिक आता त्यांचे करिअर करण्यासाठी Digital Marketing Course कडे वळत आहेत कारण या क्षेत्राची होणारी वाढ, विकास आणि भरभराट. लवचिक कामाचे तास आणि उच्च पगार. जर तुम्ही मार्केटिंग, तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया मार्केटिंगची आवड असणारे असाल, तर तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा उत्तम करिअर पर्याय आहेडिजिटल मार्केटिंग हा झपाट्याने वाढणारा उद्योग आहे आणि प्रभावी डिजिटल मार्केटिंग मोहिमांची योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना जास्त मागणी आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्ण करुन, उमेदवार या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळवू शकता.

आजच्या जॉब मार्केटमध्ये, नियोक्ते अधिकाधिक डिजिटल मार्केटिंग कौशल्य असलेले उमेदवार शोधत आहेत. डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्ण करुन, तुम्ही संभाव्य नियोक्त्यांना दाखवू शकता की डिजिटल मार्केटिंगच्या भूमिकेत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये आहेत.

डिजिटल मार्केटिंग कोर्समध्ये व्यावहारिक असाइनमेंट आणि प्रकल्प समाविष्ट असतात जे वास्तविक-जगातील डिजिटल मार्केटिंग परिस्थितींसह अनुभव प्रदान करतात. या क्षेत्रात नोकरी मिळवण्याच्या बाबतीत हा अनुभव मौल्यवान असू शकतो.डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम अनेकदा समान रुची आणि करिअरची उद्दिष्टे असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणतात. हे उद्योगातील इतर व्यक्तींसोबत तसेच संभाव्य नियोक्ते आणि व्यावसायिक संपर्कांशी नेटवर्किंग करण्याची संधी प्रदान करतेतुमचा स्वतःचा डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी, शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि बरेच काही यासारख्या सेवा ऑफर करण्यासाठी देखील डिजिटल विपणन कौशल्ये लागू केली जाऊ शकतात.

laptop, notebook, man-1071781.jpg

एकंदरीत, 12 वी नंतरचा डिजिटल मार्केटिंग कोर्स नवीन करिअरच्या संधी, वर्धित रोजगारक्षमता, हाताशी अनुभव, नेटवर्किंग संधी आणि वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल मार्केटिंग उद्योगात पुढे राहण्याची संधी यासह अनेक फायदे देऊ शकतो

नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी नवीन वर्षात आकर्षक पगारासह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बेरोजगार तरुणांना २०२4  मध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करून नवी सुरुवात करण्याची संधी आहे. LinkedIn साइटनुसार, डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात २०२३ मध्ये फक्त ८.६० लाख रिक्त पदे भरली जाणार आहेत.या पोस्ट्समध्ये सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट, एसइओ स्पेशालिस्ट, मार्केटिंग अॅनालिस्ट अशा पदांना मागणी आहे.

बीव्होक इन लॉजिस्टिकस मॅनॅजमेन्ट  (B.voc in logistics Management)  हा 3 वर्षांचा UG पदवी अभ्यासक्रम आहे जो स्त्रोत आणि गंतव्यस्थान दरम्यान वस्तू, सेवा आणि इतर संबंधित माहितीच्या स्टोरेजशी देखील संबंधित आहे.या मध्ये विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना सखोल व्यवसाय समजून घेण्याची तसेच क्षमता निर्माण करण्याची, बाजार मोजमाप, व्यवसाय पत्रव्यवहार, जाहिरात, निधी, मानवी संसाधने विचारात घेण्याची आणि ऑपरेशन्सचे नट आणि बोल्ट आत्मसात करण्याची संधी प्रदान करते. लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमधील डिप्लोमा हा एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोल्डिंग क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक कल्पना आणि प्रगत इन्व्हेंटरी नेटवर्क्सच्या समन्वयाची माहिती दिली जाते.

बीव्होक इन सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट (B.voc in Software development ) क्षेत्रात मागील दोन-तीन दशकांत आमूलाग्र क्रांती झालेली असून आजच्या तंत्राधारित आणि स्पर्धात्मक युगात हे सर्वाधिक आकर्षक क्षेत्र ठरले आहे. शासकीय, खासगी आणि सार्वजनिक आस्थापने वेगाने संगणकीकरण करत आहेत. मोबाईल आणि मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध सुविधा, ऑनलाइन मार्केटिंग, ई-कॉमर्स, नेट- बँकिंग, डिजिटल इंडिया, नेटवर्क आणि सेक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, डेटाबेस मॅनेजमेंट, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि वाढते सेवाक्षेत्र यांच्या आवश्यकतेनुसार कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून सॉफ्टवेअर विकसित करणे त्याचे व्यवस्थापन करणे अशा विविध संधी उपलब्ध आहेत. देशातील मोठी शहरे, छोटी शहरे आणि खेडी सुद्धा स्मार्ट सिटीज आणि स्मार्ट व्हिलेजेस करण्यावर भर दिला जात असून त्यामध्ये जास्तीत जास्त संगणकीकृत तंत्रज्ञान वापरले जात आहे.  या विविध संधींमुळे विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वळला असून सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य यापुढील काळात उज्ज्वल असणार आहे. 

web development, website design, software engineering-7265717.jpg

सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स (Software Applications) हे आजच्या आधुनिक डिजिटल-फर्स्ट जगाचा ड्रायव्हिंग फोर्स बनले आहेत. दररोज, जगभरातले लाखो सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developers) मानवी जीवनाला मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी असंख्य उपकरणं, यंत्रसामग्री, ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सची निर्मिती करतात, ती चालायला मदत करतात. सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाने सर्व उद्योग आणि कार्यक्षेत्रांमध्ये प्रवेश करणं सुरू ठेवल्याने, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेव्हलपर्सचं भविष्य खूप उज्ज्वल दिसत आहे. ऑनलाइन टूल्स, ट्युटोरियल्स आणि शिकवणी वर्गांच्या प्रसारामुळे या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती अनुभवी तज्ज्ञांकडून शिकू शकतात आणि त्यांची कौशल्यं सुधारू शकतात. शिवाय, जगभरातल्या संस्थांमध्ये कंत्राटी नोकर्‍या आणि रिमोट स्टाफिंगची संस्कृती रुजत असल्यामुळे बॅक-एंड डेव्हलपर्स घरी राहूनदेखील जगातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करू शकतात.

सॉफ्टवेअर  डिझायनिंग हे क्षेत्र वेगाने विकसित होत असून त्यात मोठी संधी उपलब्ध आहे. आज प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य बनत चालला आहे.  अशा काळात नेटवर्किंग इंजिनीयर, सिस्टीम डिझाईनर, सिस्टीम ॲनालिस्ट, सिस्टीम प्रोग्रामर, डेटाबेस मॅनेजर, वेब आणि मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, DevOps, डेटा सायन्स, क्वालिटी अॅश्युरन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजीनियर्स साठी भारतात खूप संधी उपलब्ध आहेत. तसेच परदेशातही भारतीय कॉम्प्युटर इंजीनियर्स ना मोठी मागणी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरी व्यतिरिक्त तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर विकसित करून स्वतःचा व्यवसाय पण करू शकता. तसेच स्टार्टअप्स कंपन्यां करिता सरकार कडून अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते.  कम्प्युटर हार्डवेअर डिझाइन, डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, ऑपरेंटिंग अँड सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज – अ‍ॅप्लिकेशन अँड सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज- टेलिकम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमध्ये स्पेशलाइज्ड असणाऱ्या कंपन्या, तसंच टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या- यूझर कंपनीज, तसंच मध्यम आणि लघु कंपन्या

– शाळा, बँका, डिपार्टमेंटल स्टोअर्स यासारखे मध्यम आणि लघु स्तरावरील यूझर्स  आजच्या घडीला कोणतंही क्षेत्र आयटी प्रोफेशनल्सशिवाय कार्यरत होऊच शकत नाही. लहान-मोठ्या प्रमाणावर का असेना; प्रत्येक क्षेत्रात या आयटी प्रोफेशनल्सची गरज असतेच. अर्थात, प्रत्येक क्षेत्रातील आयटी प्रोफेशनल्सची गरज आणि कामाचं स्वरुप वेगवेगळं आहे आणि दिवसागणिक त्यात बदल होत असतात. थोडक्यात सांगायचं, तर तांत्रिकदृष्ट्या कुशल असणाऱ्या आणि कामात येणाऱ्या समस्येला दूर करण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्तीला इथे हमखास यशस्वी करिअर करता येणं शक्य आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. व्यावसायिक अभ्यासक्रम केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही कंपनीत 20,000 ते 30,000 पर्यंत फ्रेशर म्हणून नोकरी करू शकता. त्यानंतर तुम्ही अनुभव आणि तुमच्या कौशल्यासह पुढे जाऊ शकता.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असेल. त्यासाठी कोणतीही किमान गुणांची अट नाही तसेच कुठल्याही प्रवेश परीक्षेची गरज नाही. तसेच  हे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बँक कर्ज सुद्धा उपलब्ध आहे. 

आजच्या काळात, विद्यार्थी त्यांचे कौशल्य विकास (Skill Development) अभ्यासक्रम करण्यासाठी परदेशात जातात, कारण तेथे जे काही अभ्यास केले जातात ते कौशल्य आधारित असतात. आपल्या देशाची सर्वात मोठी कमतरता म्हणजे आपण जे काही अभ्यास करतो त्यात आवश्यक कौशल्ये मिळत नाहीत. ही पोकळी भरून काढण्यासाठी, उद्योगविकास -ओ आर टी    त्यांच्या विविध B.VoC अभ्यासक्रमांद्वारे मुलांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचे आहे. जेणेकरून, सर्व विद्यार्थी चांगल्या भविष्यासाठी पूर्णपणे तयार असतील.

प्रा.डॉ.मनोजकुमार चव्हाण,संचालक -उद्योगविकास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *